नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहराजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाढलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढला आहे आज सोमवारी नवापूर शहरानजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ टाटा मॅजिक व मोटरसायकल यात अपघात झाला या अपघातात दोन्ही युवक जखमी झाले आहेत.


सविस्तर वृत्त असे की, नवापुर तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.खड्ड्याच्या या महामार्गावर अपघाताचे प्रमाण देखील तेवढेच वाढले आहे यातूनच नवापूर गावाजवळ रिलायन्स पेट्रोल पंपासमोर टाटा मॅजिक व मोटर सायकल मध्ये अपघात झाला अपघातात दोन युवक जखमी झाले असून एकाला उपजिल्हा रुग्णालय नवापूर तर दुसऱ्याला जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवापूर शहराजवळील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर नवापूर कडून सुरत कडे आपल्या मोटरसायकल (क्र. जी.जे. 19, ए.एस.1745) ने जाणारे प्रवीण सोनवणे व जितेंद्र पाटील जात असताना समोरून येणारा टाटा मॅजिक (क्र.एम. एच. 18, ए.जी. 1742 ) ने ठोस दिल्याने अपघात झाला.अपघातात मोटरसायकलस्वार दोघही युवक गंभीर जखमी झाले असून या युवकांना 108 रुग्णवाहिकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एका युवक गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दुसरा युवकावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









