शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मुलन मध्यवर्ती संघटनेतर्फे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी (ता.१४) डिसेंबर मंगळवार पासून निर्णय होईपर्यंत राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संचालनालयाचे हिवताप विभागातील अवैदयकिय आरोग्य अधिकारी , आरोग्य पर्यवेक्षक , आरोग्य सहाय्यक , बहुविद आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचारी या संवर्गाचे जुने अस्तित्वात असलेले सेवा प्रवेश शासनाने २९ सप्टेंबर २०२१ चे अधिसूचनेनुसार रद्द करून नवीन सुधारित सेवा प्रवेश लागू करण्यात आलेले आहेत.त्यामुळे या संवर्गातील पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रिया व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदावरील नवीन भरती प्रक्रिया रखडलेली आहे . त्यामुळे हिवताप योजनेतील या संवर्गातील कार्माचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून तीव्र असंतोष आहे . शासनाने २९ सप्टेंबरला ही नवीन सेवा प्रवेश नियामाची अधिसूचना निर्गमीत केली . यामध्ये पदोन्नती साखळीचा पदामध्ये शैक्षणिक पात्रतेत वाढ केली असल्याने व जुन्या नियमाप्रमाणे सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे हि शैक्षणिक पात्रता नसल्याने हे सेवाप्रवेश अन्यायकारक असल्याचे प्रथम या संघटनेने खुलासा केला आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी या अधिसूचनेनुसार आक्षेप नोंदविला आहे . नवीन सेवा प्रवेश सेवेतील जुन्या कर्मचाऱ्यांना हिताचे नसल्याने या नियमांमध्ये सुधारणा व्हावी राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री , राज्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव , संचालक , सहसंचालक यांसह सर्वच अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिली . या अधिसूचनेमुळे सेवेतील कर्मचाऱ्यांवर पदोन्नती मध्ये होत असलेला अन्याय निदर्शनास आणून दिला . तथापि शासन व प्रशासनाने बाब गांभीर्याने घेतले नाही . या ज्वलंत व न्याय मागणीवर शासनाचे लक्ष वेधावे यासाठी या संघटनेने ठिय्या आंदोलन, आक्रोश आंदोलन केले . तथापि हि बाब शासन व प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही . त्यामुळे नाईलाजास्तव राज्यातील हिवताप कर्मचाऱ्यांनी (ता.१४) डिसेंबर चे नवीन सेवा प्रवेश अधिसूचनेद्वारे पदोन्नती पदाची शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर अशी वाढ केली असल्याने जुन्या नियमाप्रमाणे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पदोन्नती साखळीतील पदावर पदोन्नतीमध्ये अन्याय होत आहे . त्यामुळे सदरचे नियमा मध्ये सुधारणा करण्यात यावी . हि एकमेव न्याय्य व ज्वलंत मागणीवरही शासन व प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील हिवताप कर्मचार्याची बोळवण करीत आहे . ज्या कर्मचाऱ्यांवर पदोन्नती मध्ये अन्याय होत आहे . त्यामध्ये अवैद्यकीय आरोग्य अधिकारी , आरोग्य पर्यवेक्षक , आरोग्य सहायक आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने १४ डिसेंबर पासून लेखणीबंद आंदोलनमध्ये सहभागी व्हावे आणि आरोग्य विभागाचे कार्य ठप्प ठेऊन शंभर टक्के आंदोलन यशस्वी करावे अशी विनंती एका पत्रकान्वये संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव ,जिल्हाध्यक्ष रमेश म्हसदे , कार्याध्यक्ष सुनील मराठे , रवींद्र महिरे, जगदीश वसईकर, रमाकांत गावित, फुलसिंग पाडवी, संजय पाटील, राकेश ठाकूर, भिक्कन वसावे, भिवसन वळवी, गोपाल पाटील, दीपक भामरे ,महेश गीते आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.










