Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायतीत ३ उमेदवारांची माघार, ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात

team by team
December 13, 2021
in राजकीय
0

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तीन जणांची माघार घेतली. त्यामुळे १७ जागांसाठी आता ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
धडगाव-रोषमाळ-वडफळ्या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार दि.१ डिसेंबर पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पाच दिवसांपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. दि.६ डिसेंबर रोजी ९ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.तर शेवटच्या दिवशी ६१ जणांनी नामांकन दाखल केले.त्यामुळे १७ जागांसाठी ७० उमेदवारांनी नामांकन दाखल झाले होते. छाननीत १९ अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपाचे विकास रमेश पावरा, प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादीच्या नितू अशोक पाडवी, प्रभाग १४ मधून अपक्ष प्रमिला प्रविण पावरा यांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ४८ उमेदवार आहेत. दि.२१ डिसेंबरला मतदान तर दि.२२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यात शिवसेनतर्फे १७, कॉग्रेसचे १७, भाजपाचे ११ तर राष्ट्रवादीचा एक तर दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस दलातर्फे कोंबींग ऑपरेशन राबवित गुन्हेगारांना केले ऑल आऊट, २३ गुन्हांची उकल, १९ जणांना अटक

Next Post

तळोदा तालुक्यात आज पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळला एक कोरोना रुग्ण

तळोदा तालुक्यात आज पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add