नंदूरबार l प्रतिनिधी
नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात रयतेचा कैवारीचे राज्यस्तरीय शिक्षण भूषण पुरस्कार व दिवाळी अंकाचे प्रकाशन उपस्थित प्रमुख अतिथी आमदार डॉ. सुधीर तांबे , के. टी.एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य डॉ. बी.ए.राजपूत गोदावरीताई परुळेकर महाविद्यालय तलासरी, बी.बी. गुंजाळ ज्येष्ठ साहित्यिक नाशिक, संजय अस्वले शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. भिवंडी, डॉ. डी. डी. सूर्यवंशी वरिष्ठ अधिव्याख्याता डायट नाशिक, डॉ. एस. के. शिंदे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ ज्ञानेश्वर काजळे शिक्षणाधिकारी (महाविद्यालयीन विभाग) मविप्र समाज नाशिक, श्रीम. सरोज जगताप,गट शिक्षणाधिकारी पेठ, संपादक शाहू भारती,उपसंपादक संजय येसी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गोपाल गावीत यांना सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प, पुस्तक देऊन राज्यस्तरीय रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३६ पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह , ‘हरवलेलं मन’ काव्यसंग्रह, पुष्पगुच्छ, शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व स्वागत गीताने झाली. प्रारंभी प्रास्ताविक उपसंपादक संजय येशी यांनी केले. यानंतर मान्यवर आ.डॉ. सुधीर तांबे, डॉ.बी.ए. राजपुत, डॉ. डी. डी.सूर्यवंशी, श्रीम. सरोज जगताप, संजय अस्वले यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत के.टी.एच.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही बी गायकवाड यांनी रयतेचा कैवारी डिजिटल शैक्षणिक वृत्तपत्र हे राज्यातील विशेषत: वाड्या-वस्त्या,पाडे,अशा दुर्गम भागातील दैनंदिन नाविन्यपूर्ण उपक्रमांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून देणारे एकमेव दैनिक असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाल गावीत यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम, बालरक्षक, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, तंबाखूमुक्त शाळा, कोरोना काळात शासनाने दिलेल्या लसीकरण, जनजागृती कार्याची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभागातून शाळा विकास, शैक्षणिक सहली, विज्ञान प्रदर्शन, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य निर्मिती, सामाजिक कार्यात सहभाग, रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून वाडी वस्ती पाड्यावरील शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध उपक्रम राबविले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसंपादक संजय येसी, नाशिक जिल्हा प्रतिनिधी बालाजी नाईकवाडी तसेच तालुक्यांचे सर्व प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन रयतेचा कैवारी लेख विभागाच्या प्रमुख सुनिता इंगळे यांनी केले ,तर आभार पेठचे प्रतिनिधी रामदास शिंदे यांनी मानले.










