नंदूरबार l प्रतिनिधी
रनाळे ता जि नंदुरबार येथे जय भगवान महासंघातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली व सी.डी. एस जनरल बिपीन रावत यांच्यासह 12 सहकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांची रनाळे येथे जय भगवान महासंघातर्फे व समस्त वंजारी समाजातर्फे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दीपक गवते यांच्या हस्ते लोकनेते स्व, गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुणे जि,प सदस्य सुरेश शिंत्रे , वंजारी समाज अध्यक्ष गोकुळ नागरे, राजेंद्र शिंत्रे , लक्ष्मण नागरे, पंडित नागरे, महिला जिल्हा अध्यक्ष सुनंदाताई कळकटे, जिल्हा मार्गदर्शक नरेंद्र नागरे, संपर्क प्रमुख योगेश गाभणे, जिल्हाअध्यक्ष महेंद्र चकोर , युवा जिल्हा अध्यक्ष नवनाथ नागरे, चेतन आव्हाड,बबलू नांगरे, हेमंत नागरे, पंकज नागरे, संतोष सानप, श्री. सोसे, सतेंन चकोर, प्रकाश चकोर, रविंद्र भाबड,सुनील शिंत्रे, बळीराम नागरे, बुधा धात्रक, छोटू गवते, धर्मेंद्र शिंत्रे, नाना शिंत्रें,शांताराम नागरे छोटू गवते हर्षल नागरे, सचिन नागरे , जबा नांगरे भूषण गीते , बाळा घुगे, जयेश घुगे, सचिन नागरे, , संजोक काकडे, सौरव काकडे, डॉ, स्मित भाबड, हरीश काकडे, राहुल चौधरी, सनी सोनार ,प्रफुल नागरे, गुरुप्रसाद पेटकर, गौरव आव्हाड, यांच्यासह जय भगवान महासंघाचे पद्धधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी दुर्घटनेत शहीद झालेले देशाचे पहिले सी. डी.एस.जनरल बिपिन रावत तसेच त्यांचे अन्य 12 सहकारी या सर्व शहिदांना जय भगवान महासंघाच्या वतीने मेन बाजार चौक पासून, साई बाबा मंदिरा पर्यंत कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते ,दीपक गवते, सुरेश शिंत्रे , राजेन्द्र शिंत्रे, योगेश गाभने, महेंद्र चकोर, नाना शिंत्रे , नरेंद्र नागरे यांनी मनोगत पर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अध्यक्ष महेंद्र चकोर,यांनी तर प्रास्तविक योगेश गाभने तर कार्यक्रम यशस्वीसाठी जिल्हा मार्गदर्शक नरेंद्र नागरे, नवनाथ नागरे , गुरुदास पेटकर, चेतन आव्हाड यांनी केले.










