Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंद हॉटेल मध्ये मुक्कामी असलेल्या ग्राहकाच्या खिशातून महिलेने लांबवले ६० हजार, पोलिस गेले तपासाला आढळला बेकायदा मद्यसाठा

team by team
July 9, 2021
in क्राईम
0
तळोदा ! प्रतिनिधी
तळोदा शहरानजीक शहादारशहादा असणाऱ्या एका हॉटेल मध्ये रात्री मुक्कामास थांबलेल्या एका ग्राहकाच्या खिशातून पैसे चोरीस गेल्यावरून वाद झाला. दरम्यान या बाबतीत मार्ग न निघाल्याने हा विषय पोलीस ठाण्यात गेला. मात्र शेवटी त्या व्यक्तीचे पैसे परत मिळाल्याने विषय रफादफा करण्यात आला. दरम्यान विषय मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी सील बंद करण्यात आलेल्या त्या हॉटेलात दारूचा साठा मिळाल्याने पोलिसांनी दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
  याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा शहादा रस्त्यावर असणाऱ्या एका हॉटेलात बुधवारी रात्री धुळे येथील दोन व्यक्ती मुक्कामी आले असता सकाळी एका व्यक्तीचे एकूण ६० हजार इतकी रक्कम खिशातून गहाळ झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
या बद्दल संबधित व्यक्ती ने स्थानिक संपर्क वापरून पोलिसांना कळविले पोलीस गाडीत दोन कर्मचारी या हॉटेलात दाखल झाले. त्याचवेळी प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी पोहचले. दरम्यान संबंधित व्यक्तीने माझ्या खिशातून पैसे गहाळ झाले असून ते पैसे येथील महिलेने चोरले असल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत वेळोवेळी विनवण्या करूनही संबंधित पैसे देत नसल्याने पोलिसांनी मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सदर महिलेने हा आरोप खोडत स्पष्टपणे याबाबत नकार दिला.  दरम्यान गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दुकान मालक यांनी मध्यस्थी करत रक्कम परत करण्याचे महिलेस सांगितले त्या अनुषंगाने 60 हजारांपैकी काही रक्कम त्या प्रतिष्ठित व्यक्तीस परत देण्यात आली. व उर्वरित रक्कम देखील परत करण्याचे आश्वासन दिले.  दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचल्याने व दारू विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने संबंधितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. व संबधीत प्रियंका हॉटेलचे मालक संजय ब्रिजलालाल चौधरी यांच्यावर दि.पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा7 जुले रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल प्रियंका येथे पाच हजार नऊशे रुपयांची बेकायदेशीर दारू आढळून आल्याने संबधितांवर दारू विक्रीसह याठिकाणी मध्यसाठा सोबत एक महिला आढळून आल्याने सार्वजनिक शांतता भंग करत बीभत्स वर्तन केल्याने मुंबई पो.कायदा कलम 110,117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नी.पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे दिलीप साळवे हे करीत आहे.
  या पूर्वी देखील या ठिकाणी एका गंभिर गुन्ह्याचा तपास कामी नंदुरबार येथील पोलिस पोहचल्या नंतर प्रसिद्धी माध्यम पोहोचल्यामुळे अवैध दारू विक्री बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता परत  तसाच काहीसा प्रकार समोर आल्यानंतरही पोलिसांकडून किरकोळ गुन्हे दाखल केल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तळोदा येथे एका हॉटेलमध्ये छुप्या पद्धतीने देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची व याठिकाणी तरुणींना जबरदस्ती व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याबाबतची तक्रार दि.19 मार्च 2021 रोजी पश्चिम बंगाल येथील तरुणीने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात केली होती.  त्या अनुषंगाने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्या पथकाने 108/2021 IPC 366, 370 च्या तपासकामी प्रियंका  हॉटेल तळोदा येथे झडती घेता किरकोळ बिअर्सच्या बॉटल्स व्यतिरिक्त गुन्हे संदर्भात पथकास  संशयास्पद काहीही एक आढळून आले नव्हते.
याठिकानी सुरू असलेल्या प्रकराबाबत आमदार राजेश पाडवीसह शहरातील लोकप्रतिनिधीनी देखील कारवाई होणेबाबत पोलीस प्रशासनास तक्रार केली आहे. मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष झाले असून याठिकाणी दारू विक्री व इतर अवैद्य प्रकार सुरू असल्यामुळे भविष्यात तळोदा शहराचे स्वास्थ बिघडण्याची  चिंता व्यक्त करण्यात येत आहे..
बातमी शेअर करा
Previous Post

स्वछ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव स्पर्धा, 15 जुलै पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

Next Post

अखेर राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकींना दिली स्थगिती

Next Post
अखेर राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकींना दिली स्थगिती

अखेर राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकींना दिली स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026
पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

November 21, 2026
शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 21, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

November 21, 2026
नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

November 21, 2026
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add