Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वछ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव स्पर्धा, 15 जुलै पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

team by team
July 9, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा 2 अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव या स्पर्धेचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी दि.15 जुलै 2021 पर्यंत  आपल्या प्रवेशिका सादर कराव्यात असे आवाहन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
       स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा एक मध्ये हागणदारी मुक्ती चे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या टप्पा 2 मध्ये शौचालयाचा वापर कायम ठेवून व्यापक प्रमाणावर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाद्वारे खेड्यांमध्ये हागणदारीमुक्त अधिक या मार्गावर नेणे हे उद्दिष्ट आहे.त्याअनुषंगाने शासनाने लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे .स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मध्ये अधोरेखित केलेल्या हागणदारीमुक्त अधिक ध्येयांबाबत व्यापक जागरूकता वाढविण्यासाठी माहिती शिक्षण व संवाद मोहीम राबविण्यात येत आहे. अमृतमहोत्सव स्पर्धेतील लघुपटाचे विषय आणि पुरस्कार  दोन टप्प्यात असून  स्पर्धेसाठी हागणदारीमुक्त अधिक व आपली भौगोलिक परिस्थिती या दोन्ही भागांमधील विषयांची निवड करता येणार आहे.
        स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनमधील  हागणदारीमुक्त अधिक  सहा घटकांवर आधारित आहे.पैकी  कोणत्याही एका विषयावर लघुपट तयार करण्यात यावा. सदरील लघुपटात ग्रामीण वातावरण असणे आवश्यक आहे . यामध्ये जैवविघटनशील कचरा व्यवस्थापन,गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन ,वर्तणूक बदल या विषयांचा समावेश आहे . प्रत्येक विषयाकरिता अनुक्रमे  प्रथम क्रमांक 1,60,000 रुपये दुसरा क्रमांक 60,000 रुपये तर  तिसरा क्रमांकासाठी  30,000 रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
             भौगोलिक परिस्थिती या भागातील लघुपटामध्ये संपूर्ण स्वच्छता संदेश किंवा ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन संबंधित तांत्रिक उपाय याबाबत लघुपट असावा . सदरील लघुपटात स्वच्छता संदेश किंवा तांत्रिक उपाय खालील पैकी पाच भौगोलिक क्षेत्राशी संबंधित असावेत. यामध्ये वाळवंटे क्षेत्र ,डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्र या विषयांचा समावेश आहे.यात प्रथम क्रमांकासाठी 2,00,000 रुपये ,दुसरा क्रमांक साठी 1,20,000 रुपये ,तिसऱ्या क्रमांकासाठी 80,000 रुपये बक्षीस आहे.
         केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळता दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. संस्थात्मक श्रेणीत ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था ,स्वयंसेवी संस्था ,बचत गट देखील सहभाग नोंदवू शकतात .लघुपटाचा कालावधी कमीत कमी 1 मिनिट व जास्तीत जास्त पाच मिनिटांच्या दरम्यान असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मित केलेले लघुपटात या स्पर्धेसाठी स्वीकारले जातील. सर्व मान्यताप्राप्त भारतीय भाषा बोलींमधील लघुपट स्पर्धेत पात्र आहेत .सदर स्पर्धेत प्रस्तुत केलेल्या लघुपटावर भविष्यातील वापरासाठी कोणत्याही हस्तक्षेप किंवा परवानगीशिवाय पेयजल व स्वच्छता विभागाच्या (कॉपीराइट) अधिकारात (संकेतस्थळ, समाज माध्यमे आणि इतर )असेल याची नोंद घ्यावी. लघुपटाच्या निर्मितीमध्ये समावेश असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती, गाणी, फुटेज इत्यादींबाबत च्या कोणत्याही कायदेशीर किंवा आर्थिक गुंतवणुकीसाठी पेयजल व स्वच्छता विभाग जबाबदार राहणार नाही.
       पुरस्कारासाठी स्पर्धकाने सादर केलेला लघुपट मूळ प्रत असल्याचे स्वप्रमाणित करणे आवश्यक आहे. प्रत्येक लघुपटामध्ये स्पष्ट व्हिडिओ संवाद, संगीत, गाणे इत्यादी असणे आवश्यक आहे .स्पर्धक स्थानिक, भौगोलिक परिस्थिती ,मुद्दे ,संगीत इत्यादींचा विचार करू शकतात . सर्व निवडक लघुपट पेयजल व स्वच्छता विभागाच्या पोर्टलवर राज्य किंवा जिल्ह्यांच्या वापरकर्त्याच्या नावाने लघुपट सादर करण्यात यावा. सादर करण्यात आलेल्या लघुपटाच्या सोबत सहभागी चे नाव, संपर्क क्रमांक, थीम, श्रेणी बद्दल स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे . स्पर्धकाने आपला वैध व सक्रिय ईमेल आयडीसह लघुपट युट्युब वर अपलोड करावा . अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने https:www.mygov.in/ या संकेत स्थळावर स्पर्धेच्या अर्जासह सादर करणे आवश्यक आहे .
       तसेच सादर केलेल्या लघुपटांच्या विषयानुसार पुरस्काराकरिता पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय समिती मार्फत निवड करण्यात येईल. स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त लघुपटांची घोषणा 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन केली जाईल .सादर केलेल्या लघुपटाच्या पुनर्मूल्यांकन संबंधित कोणत्याही विनंत्यांचा विचार केला जाणार नाही. राष्ट्रीय समितीचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल याची नोंद घ्यावी .मूल्यमापनाच्या कोणत्याही टप्प्यावर मार्गदर्शक तत्वांच्या नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता लघुपट मूल्यांकन प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. अधिक माहिती करिता https://innovateindia.mygov.in/sbmg-innovation-challange/ ही लिंक पहावी.तसेच 02562229424 या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात स्वयंचलित कृषी हवामान यंत्रामुळे दर १५ मिनिटांनी मिळणार हवामानाची माहिती

Next Post

बंद हॉटेल मध्ये मुक्कामी असलेल्या ग्राहकाच्या खिशातून महिलेने लांबवले ६० हजार, पोलिस गेले तपासाला आढळला बेकायदा मद्यसाठा

Next Post

बंद हॉटेल मध्ये मुक्कामी असलेल्या ग्राहकाच्या खिशातून महिलेने लांबवले ६० हजार, पोलिस गेले तपासाला आढळला बेकायदा मद्यसाठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add