तळोदा ! प्रतिनिधी
तळोदा शहरानजीक शहादारशहादा असणाऱ्या एका हॉटेल मध्ये रात्री मुक्कामास थांबलेल्या एका ग्राहकाच्या खिशातून पैसे चोरीस गेल्यावरून वाद झाला. दरम्यान या बाबतीत मार्ग न निघाल्याने हा विषय पोलीस ठाण्यात गेला. मात्र शेवटी त्या व्यक्तीचे पैसे परत मिळाल्याने विषय रफादफा करण्यात आला. दरम्यान विषय मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी सील बंद करण्यात आलेल्या त्या हॉटेलात दारूचा साठा मिळाल्याने पोलिसांनी दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा शहादा रस्त्यावर असणाऱ्या एका हॉटेलात बुधवारी रात्री धुळे येथील दोन व्यक्ती मुक्कामी आले असता सकाळी एका व्यक्तीचे एकूण ६० हजार इतकी रक्कम खिशातून गहाळ झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
या बद्दल संबधित व्यक्ती ने स्थानिक संपर्क वापरून पोलिसांना कळविले पोलीस गाडीत दोन कर्मचारी या हॉटेलात दाखल झाले. त्याचवेळी प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी पोहचले. दरम्यान संबंधित व्यक्तीने माझ्या खिशातून पैसे गहाळ झाले असून ते पैसे येथील महिलेने चोरले असल्याचे पोलिसांना सांगितले. याबाबत वेळोवेळी विनवण्या करूनही संबंधित पैसे देत नसल्याने पोलिसांनी मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सदर महिलेने हा आरोप खोडत स्पष्टपणे याबाबत नकार दिला. दरम्यान गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने दुकान मालक यांनी मध्यस्थी करत रक्कम परत करण्याचे महिलेस सांगितले त्या अनुषंगाने 60 हजारांपैकी काही रक्कम त्या प्रतिष्ठित व्यक्तीस परत देण्यात आली. व उर्वरित रक्कम देखील परत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचल्याने व दारू विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने संबंधितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. व संबधीत प्रियंका हॉटेलचे मालक संजय ब्रिजलालाल चौधरी यांच्यावर दि.पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा7 जुले रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल प्रियंका येथे पाच हजार नऊशे रुपयांची बेकायदेशीर दारू आढळून आल्याने संबधितांवर दारू विक्रीसह याठिकाणी मध्यसाठा सोबत एक महिला आढळून आल्याने सार्वजनिक शांतता भंग करत बीभत्स वर्तन केल्याने मुंबई पो.कायदा कलम 110,117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पो.नी.पंडित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे दिलीप साळवे हे करीत आहे.
या पूर्वी देखील या ठिकाणी एका गंभिर गुन्ह्याचा तपास कामी नंदुरबार येथील पोलिस पोहचल्या नंतर प्रसिद्धी माध्यम पोहोचल्यामुळे अवैध दारू विक्री बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता परत तसाच काहीसा प्रकार समोर आल्यानंतरही पोलिसांकडून किरकोळ गुन्हे दाखल केल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तळोदा येथे एका हॉटेलमध्ये छुप्या पद्धतीने देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची व याठिकाणी तरुणींना जबरदस्ती व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याबाबतची तक्रार दि.19 मार्च 2021 रोजी पश्चिम बंगाल येथील तरुणीने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्या अनुषंगाने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्या पथकाने 108/2021 IPC 366, 370 च्या तपासकामी प्रियंका हॉटेल तळोदा येथे झडती घेता किरकोळ बिअर्सच्या बॉटल्स व्यतिरिक्त गुन्हे संदर्भात पथकास संशयास्पद काहीही एक आढळून आले नव्हते.
याठिकानी सुरू असलेल्या प्रकराबाबत आमदार राजेश पाडवीसह शहरातील लोकप्रतिनिधीनी देखील कारवाई होणेबाबत पोलीस प्रशासनास तक्रार केली आहे. मात्र तक्रारीकडे दुर्लक्ष झाले असून याठिकाणी दारू विक्री व इतर अवैद्य प्रकार सुरू असल्यामुळे भविष्यात तळोदा शहराचे स्वास्थ बिघडण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे..