नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ व बडगुजर समाज महिला उन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.५ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया कमी प्रमाणात होत होत्या. परंतु कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने रुग्णालयात शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. अशा काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अशावेळी वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत अनेकांनी सामाजिक कार्यक्रमांद्वारे रक्तदान शिबिर घेतले. याच अनुषंगाने रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता छोटासा प्रयत्न म्हणून येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ व बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.५ डिसेंबर २०२१ रोजी येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त समाजाबांधव व नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय संतोष बडगुजर व महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता मनोज बडगुजर यांनी केले आहे.









