नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने नंदूरबार तालुक्यात १५७ मेंढ्या दगावल्या असून रनाळे शिवारात एका गाईचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल नंदुरबारचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.

नंदूरबार जिल्हात पावसाची रिपरिप सुरू असल्याने वातावरणात गारठा वाढला. यात तालुक्यात१५७ मेंढ्या दगावल्या असून रनाळे शिवारात एका गाईचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत तलाठी यांच्याकडून आलेल्या प्राथमिक अहवालानुसार नंदूरबार तालुक्यात दि. 2 डिसेंबर रोजी रात्री झालेल्या पावसामुळे व थंडीच्या गारठयामुळे नळवे खु . नळवे बु.गावाजवळ, करजकुपे शिवारात येथे एकूण 23 मेंढ्या दगावल्या, तसेच वडवारे येथील ६८ मेंढ्या,होळ तर्फ रनाळे येथील शिवारात 21, तलवाडे खु .येथील 18 व अखवाडे येथे १,निंभेल शिवारात 12 मेंढया , रनाळे शिवारात 16 मेंढ्या अशा नंदूरबार तालुक्यात एकूण 154 मेंढ्या दगवल्या आहेत.तसेच रनाळे शिवारात एका गाईचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल नंदुरबारचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्याची माहिती दिली आहे.









