नंदुरबार l प्रतिनिधी –
नंदूरबार शहरातील भोणे फाट्याजवळ उभ्या असलेल्या डंपरला भरधाव वेगात येऊन ॲपेरिक्षाने मागून धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी नंदूरबार पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील हॉटेल गौरव पॅलेस भोणे फाट्या जवळ डंपर ( क्र.एम.एच 18-8351) वरील चालकाने वाहन उभे केले होते . काल दि. ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५५ वाजेदरम्यान याच परिसरातून आलेल्या एका ॲपेरिक्षाने ( क्र.एम.एच ४१, बी. ८३५१ ) डंपरला मागून धडक दिली . या अपघातात दोंडाईचा येथे रेल्वेतील आरपीएफ जवान चरणसिंग गावित ( वय 49 ) रा . मंजुळा विहार , दुधाळे शिवार, नंदुरबार, प्रवीण अंबालाल परदेसी ( वय 38 ) रा. डांगरी, दोंडाईचा ता. शिंदखेडा यांना गंभीर दुखापत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी ऋषिकेश चरणसिंग गावीत यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात डंपर ( क्र.एम.एच 18-835) वरील अज्ञात चालला विरूद्ध भादवी कलम 304 (अ),279, 427 मोटार वाहन कायदा 84,3/ 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते करीत आहेत.








