नंदुरबार | प्रतिनिधी
सातपुडयातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील सचिन वसावे याची इरफान पठाण यांच्या अकॅडमी दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे .७ डिसेंबर रोजी दुबई येथे क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होणार
होता मात्र जगात ओमायक्रोने थैमान घातल्याने परदेशात जाणाऱ्या विमान वाहतूकीला याचा फटका बसला, त्यामुळे सचिन वसावेचा दुबई दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.सध्या तो मोलगी येथे प्रॅक्टिस करीत आहे .
सातपुडयातील दुर्गमभाग असलेल्या बालाघाट ( ता . अक्कलकुवा ) येथे राहणाऱ्या सचिन मानसिंग वसावे याचे बीएससी कॉम्प्युटर डीएमटीचे झाले आहे . त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती . त्यामुळे तो मिळल त्याठिकाणी क्रिकेटचा सराव करीत होता . दरम्यान त्याचे कौशल्य व मेहनतीचा जोरावर कॅम्प लुधीयाना या इरफान पठाण अकॅडमीत निवड झाली होती. तो दि . ७ डिसेंबर रोजी दुबई येथे क्रिकेट खेळण्यासाठी रवाना होणार होता . दुबई येथे पाकिस्तान , श्रीलंका , बांग्लादेश आणि आफ्रिका संघाविरूध्द सामने खेळण्याची त्याला संधी मिळनार होती . त्याचा सरावासाठी डॉ.मनोज पावरा हे मार्गदर्शन करीत आहेत . सातपुडयातील दुर्गम भागातील लहान खेडयात आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मान सचिन वसावे यांनी पटकाविला आहे .दरम्यान दि. ७ डिसेंबर रोजी दुबई येथे क्रिकेट खेळण्यासाठी सचिन वसावे रवाना होणार होता. मात्र जगात ओमायक्रोनने थैमान घातल्याने परदेशात जाणाऱ्या विमान वाहतूकीला याचा फटका बसला त्यामुळे सचिन वसावेचा दुबई दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.पुढील महिन्यात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दुबई येथे क्रिकेट खेळण्यासाठी तो रवाना झाला आहे.
जगात ओमायक्रोनने थैमान घातल्याने परदेशात जाणाऱ्या विमान वाहतूकीला याचा फटका बसला त्यामुळे दुबई दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.याबाबत जिल्ह्यातील अनेक हितचिंतकांनी याबाबत विचारणा केली.पुढील महिन्यात दुबई येथे जाणार असून प्रॅक्टिससाठी अजून एक महिना मिळाला आहे.सर्व्यांच्या आशीर्वादाने यशस्वी होईल असे सचिन वसावे यांनी पब्लिक मिरर न्युजशी बोलताना सांगितले.








