नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय तांत्रिक विद्यालय, नंदुरबार येथे सफाईगार (एक पद) कंत्राटी पध्दतीने नऊ महिन्याकरिता भरण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी आपले परिपुर्ण प्रस्ताव 6 डिसेंबर 2021 पर्यंत सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नंबर 27 नंदुरबार येथे सादर करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि.रा. रिसे यांनी केले आहे.








