Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु होणार

team by team
December 1, 2021
in शैक्षणिक
0

नंदूरबार l प्रतिनिधी
सैनिक भरतीमध्ये एनडीएमध्ये महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. तशीच प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथे कार्यरत आहे. त्याच धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीने याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करावा, असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

नाशिक येथे महिलांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत व 14 जानेवारी 2021 रोजी सैनिक दिन साजरा करण्याबाबत मंत्रालयीन दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस माजी सैनिक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक (पूनर्वसन) ले. कर्नल रा.रा. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे मेजर प्रांजल जाधव (नि), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक ले.कमांडर ओंकार कापले (नि), सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव, संचालक सैनिक कल्याण औरंगाबाद अमित दळवी उपस्थित होते.

माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, यासंदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने 15 दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा. उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता घेऊन त्याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात यावे. वसतीगृहाची सोय भोजन खर्च, पोलीस प्रशिक्षण केंद्र यांचेशी संवाद साधून त्यांना पीटी खेळासाठी मैदानाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच त्यांच्या निवड प्रकियेची व्यवस्था तयार करण्यात यावी. यासाठी समांतर जागेची मागणीच्या माध्यमातून महिलांसाठी 30 जागा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याबाबतचा प्रस्ताव समितीने तातडीने सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना नोकरीसह भारताचा नागरिक म्हणून त्यांच्या व्यक्तीगत जीवनात या प्रशिक्षणाचा लाभ होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

खोडसगाव येथे शाळेत बैलगाडीतून वाजतगाजत विद्यार्थ्याची काढण्यात आली मिरवणूक

Next Post

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामिण भागात ६० टक्के तर शहरी भागात ४४.६९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती

Next Post
पावणे दोन वर्षापासून घरात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष शाळेत घेतले शिक्षण

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामिण भागात ६० टक्के तर शहरी भागात ४४.६९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add