नंदूरबार | प्रतिनिधी
धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज दि. १ डिसेंबर रोजी निवडीणुक घेण्याम आली. यात माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांची अध्यक्षपदी विजयी तर उपाध्यक्षपदी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील निवड झाली.
धुळे – नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात विविध मतदार संघातून माजी आ. राजवर्धन कदमबांडे, दीपक पाटील, दर्यावगीर महंत, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावीत, शिला पाटील, सीमा रंधे, भरत माळी, प्रभाकर चव्हाण, आ. शिरीषकुमार नाईक, माजी आ. प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर, भगवान पाटील, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, संदीप वळवी हे नवनिर्वाचित सदस्य आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज दि. १ डिसेंबर रोजी निवडणुक होती.यात अध्यक्षपदासाठी माजी आ. राजवर्धन कदमबांडे व माजी आ. शरद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.तर उपाध्यक्षपदासाठी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी अर्ज दाखल केले होते.दरम्यान अध्यक्षपदासाठी माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांना १२ तर माजी आ. शरद पाटील यांना ५ मते मिळाल्याने माजी आ.राजवर्धन कदमबांडे विजयी झाले.
तर उपाध्यक्षपदासाठी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांची निवड झाली.यावेळी त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे.








