नंदूरबार l प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती जुन्या न्यायालयाच्या जागेवर सुरू असलेल्या नगरपालिका इमारतीच्या बांधकामासाठी आलेल्या लोखंडाचा ट्रक जुने नगरपालिका समोर अचानक बंद पडला. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अवजड वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ( एम. एच.- 18 एए 8887) क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंड आणण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे सदर ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी देवीदास पाटील, महेंद्र मोरे, धनंजय शिरसाठ, आणि शरीफ पिंजारी यांनी नागरिकांच्या मदतीने सदर ट्रकला धक्का देऊन मार्गस्थ केला. काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने सदर ट्रकचालकास मदत करून बंद पडलेल्या ट्रकला मार्गस्थ केले. याबद्दल शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे वाहतूक तुरळक होती. मात्र रस्त्याच्या मधोमध अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तातडीने वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.
.









