नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील प्रा. आ. केंद्र आष्टे मधील ठाणेपाडा उपकेंद्र येथे १०० टक्के कोरोना लसीकरण झाले असून ग्रामीण भागातील प्रथमच एखादया उपकेंद्रात १०० टक्के लसीकरण करण्यात यश आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी देसले त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लसीकरणाचा नवा उच्चांक निर्माण केला आहे.
ठाणेपाडा उपकेंद्र हे दुर्गम भागात असुन यात ठाणेपाडा, गंगापुर, अजेपुर या तीन गावांचा समावेश होतो. एकुण लोकसंख्या ६००२ असुन १८ + लसीकरणाचे उद्दिष्ट ४ हजार ३८२ होते. यात स्थलांतरीत १६० तसेच नकार असणारे केवळ ९ लाभार्थी वगळता सर्व ४ हजार २१३ लाभार्थ्यांना लसीकरण करुन १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले.
सध्या संपुर्ण भारतात केंद्र सरकारने सुरु केलेला हर घर दस्तक हा लसीकरणाची व्याप्ती वाढविणारा कार्यक्रम अतिशय युध्द पातळीवर सुरु आहे .बर्याच ठिकाणी जिथे लोकांच्या मनात लसीकरणाविषयी भिती, गैरसमज, अंधश्रध्दा इ. असल्यामुळे जे लसिकरणास प्रवृत्त होत नाहीत त्यांची भिती काढुन, त्यांना समजावुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना लसीकरणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या महाराष्ट्रात लसीकरणाची टक्केवारी अतिशय कमी आहे. आदिवासी, अतिदुर्गम भाग असल्यामुळे इथे लसीकरणाचा टक्का वाढवितांना आरोग्य विभागाला प्रचंड कसरत करावी लागत आहे. परंतु याच नंदुरबार जिल्हयातील, नंदुरबार तालुक्यातील प्रा. आ. केंद्र आष्टे मधील ठाणेपाडा उपकेंद्राने डॉ. अश्विनी देसले त्यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचा नवा उच्चांक निर्माण केला असुन त्यांच्या कार्यक्षेत्रात १०० टक्के लसीकरण पुर्ण केले आहे.
यात खुप सार्या लाभार्थ्यांचा विरोध असतांनासुध्दा त्यांना समजावून, लसीकरणाचे महत्व पटवून शेतात, डोंगरावर अन्न, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत करुन हे उद्दिष्ट गाठण्यात आले.
याबाबत आमच्या प्रतिनिधीनी डॉ. अश्विनी देसले यांना विचारले असता त्यांनी या कामात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, जि. प. सदस्य देवमन पवार, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन तसेच वै. अ. डॉ. गोपिन वळवी, डॉ. योगेश पाटील तसेच समन्वयक डॉ. संदिप काकुस्ते यांची मोलाची साथ व एच. ए. प्रकाश साळुंखे, एम पी डब्ल्यू जाधव, ए एन एम गायकवाड व सर्व आशा सेविका, सर्व अंगणवाडी सेविका, लोक प्रतिनिधी ,सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक यांनी डॉ. अश्विनी देसले यांच्या नेतृत्वाखाली केलेली मेहनत व त्यात डॉ. कपिल सुर्यवंशी, मोटे सिस्टर यांनी दिलेली साथ या सगळयांच्या अथक प्रयत्नांमुळेच आम्ही हा टप्पा गाठल्याचे सांगितले.नकार देणार्या ९ जणांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की आपण लोकशाही देशात आहोत म्हणून त्यांच्या नकाराच्या मतांचा पण आम्ही सन्मान करतो परंतु लवकरच त्यांचे मत परिवर्तन करुन, त्यांचे गैरसमज दुर करुन त्यांना लसीकरणास प्रवृत्त करत असल्याचे सांगितले.
एका महिला अधिकार्याच्या नेतृत्वात दुर्गम भागात मिळालेले हे यश निश्चित जिल्हयातील लसीकरणासाठी आशेचा किरण ठरणार आहे. त्यांची धडाडी , मेहनत निश्चित सगळयांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. यासाठी त्यांचे सर्व अधिकार्यांकडून व सर्व थरातुन कौतुक होत आहे.
नंदुरबार जिल्हयातील लोकांनी देखिल गैरसमज न बागळता लवकरात लवकर लसिकरण पुर्ण करुन घ्यावे व तिसर्या लाटेला आळा घालावा असे आवाहन या निमित्ताने आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.