नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील वावद येथे चोरट्यांनी दोन घरात घरफोडी करीत ७ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार तालुक्यातील वावद गावातील खटुबाई हरचंद जावरे हया त्यांचे नातजावई यांच्या खांडबारा ता . नवापूर गावी गेलेले असतांना त्यांच्या घरी मुलगा व सुन झोपयला बाजुच्या घरात दरवाज्याला कुलूप लावून घरात झोपलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाज्याचे कुलुपची कडी कापून घरात प्रवेश करून घरातील भिंतीलगत ठेवलेल्या लोखंडी पेटीतील ३ लाख ८५ हजार रुपये रोख, ९९ हजार ५०० रु . कि . १२९ भार चांदीचे दागिने, २ लाख ३६ हजार रु . कि . ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ७ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.तसेच त्यांच्याच गल्लीत राहणारी फिर्यादी यांची मोठी सुन पुष्पाबाई संतोष जावरे हे घरात कुलुप लावून शेतात राहत असल्याने त्यांच्या देखील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून त्यांचे देखील नमुद वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणून खटुबाई हरचंद जावरे रा . वावद ता . नंदूरबार यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि राहुल पवार करीत आहेत.










