नंदूरबार l प्रतिनिधी
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे . केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत .राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे .यात रिक्षा , टॅक्सी , बस , कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल .तर दंडाच्या रकमेत ही वाढ करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे . केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत . परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे . राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे . यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे . त्यासोबत मॉल , सभागृह , कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत . राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले आहेत . प्रवास करताना लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र असणं बंधनकारक करण्यात आले आहे .यात रिक्षा , टॅक्सी , बस , कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल . म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे . लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही . महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक सिनेमा हॉल , लग्नाचे हॉल , सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल . मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड, दुकानात ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड , तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड, राजकीय सभा , कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड, टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड तसेच वाहन मालकासही ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.










