नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यात गुजर भवाली व करजकुपा येथे घरगुती वापरासाठी आकडा टाकून चोरून कनेक्शन घेऊन 2 लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता राजश्री भरत पाटील ( नंदुरबार ग्रामीण ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गंगाराम उत्तम गावीत रा . गुजर भवाली ता .नंदुरबार यांनी तसेच नरोत्तम जाधव चौधरी रा . करजकुपा ता . नंदुरबार यांनी अधिकृत कनेक्शन न घेता स्वत : च्या घरी म . रा . वि . वि . कंपनीच्या लाईनवर अंदाजे २५ फुट वायरने आकडा टाकून बेकायदेशीर रित्या घराचे वापरासाठी वीज वापर करतांना आढळले .त्यांनी 2 लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कंपनीच्या कनिष्ठ अभियंता राजश्री भरत पाटील यांच्या फिर्यादवरून दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करकरण्यात आला.










