नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तर शहादा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी पुन्हा दिपक बुधवंत यांची बदली करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राहुल पवार यांची नियुक्ती झाल्यांनंतर काही दिवसातच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांची पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांची तडकाफडकी बदली केली होती.त्याच्या जागेवर शहादा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राहुल पवार यांची नियुक्ती केली होती.दरम्यान एक दिड माहिन्याच्या कालावघी लोटत नाही. तेवढ्यात पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षकपदी राहुल पवार यांची बदली करीत त्यांना पुन्हा नंदूरबार तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला तर शहादा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी पुन्हा दिपक बुधवंत यांची बदली करण्यात आली आहे. काल रात्री उशीराच पोलीस निरीक्षक राहुल पवार व दिपक बुधवंत हे नेमनुकीच्या ठिकाणी हजर झाले.