नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे- नंदूरबार विधान परिषदेच्या निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी चौघांनी अर्ज माघार घेतल्याने भाजपचे विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपचे विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल आणि महाविकास आघाडीतर्फे गौरव वाणी यांच्यात लढत होईल अशी शक्यता होती. मात्र गौरव वाणी, अपक्ष आमदार दिपक दिघे, शाम सनेर यांच्यासह एका उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे अमरीशभाई पटेल यांची भाजपचे विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.