नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातुन अज्ञात चोरट्यांनी वैद्यकीय अधिकार्याची बॉलेरो लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील शारदा नगर मध्ये राहणारे वैद्ययि अधिकारी डॉ.नरेश मातीराम पाडवी यांची अडीच लाख रूपये किंमतीची बॉलेरो गाडी (एम.एच.३९, डी.२०४४ ) अज्ञात चोरट्यांनी नंदुरबार शहरातील गिरीकुंज सोसायटी, खोडाईमाता रोड नंइुरबार येथुन २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी वैद्ययि अधिकारी डॉ.नरेश मातीराम पाडवी रा. शारदा नगर, नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ जगदिश पवार करीत आहेत.