अक्कलकुवा l प्रतिनिधी
शासकीय आश्रम शाळेतील मानधनावर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना कामावर घेण्यात यावे यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी दि. २४ रोजी अक्कलकुवा येथील तहसीलदार कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रकल्प अधिकारी डॉ मैनांक घोष यांनी ताबडतोब ६१ कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कामावर सामावून घेतले.
शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी शासकीय आश्रम शाळेतील मानसेवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय मिळावा यासाठी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते त्यात त्यांनी म्हटले होते की सन -२० -२१चे फ्रेबुवारी ते एप्रिल चे मानधन मिळावे तसेच दिनांक २ ऑगस्ट पासून नवीन आदेश मिळावेत अशी मागणी केली होती त्यानुसार त्यांनी काल अक्कलकुवा ब-हाणपुर रस्त्यावर अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयासमोर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर प्रकल्प अधिकारी डॉ मैनांक घोष, तहसीलदार सचिन म्हस्के यांनी सर्व मागण्या मंजूर करुन लागलीच ६१ कर्मचाऱ्यांना आदेश दिले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, जिल्हा परिषद सदस्य वसावे,युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट, छोटुभैय्या हाश्मी, मोहन वसावे,गोलु चंदेल,रोहित चौधरी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होते.








