नंदुरबार l प्रतिनिधी
मूळचे तळोदा येथील रहिवासी आणि ग्राहक पंचायतचे नाशिक विभागीय माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक मार्तंडराव व्यंकटेश जोशी ( ऊर्फ बाबा जोशी) (वय 83) यांचे काल दि.२४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५५ वा. पुणे येथे निधन झाले. पुणे येथील वैकुंठात अंत्यसंस्कार करण्यात आले. , ग्राहक चळवळीचे एक अंग , उत्तम शिक्षक अशी ओळख असणारे व्यक्तिमत्त्व मार्तंड जोशी यांच्या पश्चात मुलगा संकेत जोशी तसेच मुलगी व जावई, नातवंडे असा परिवार आहे.