नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, नंदुरबारच्या वतीने कार्यकारी अभियंता, महा.राज्य विज वितरण कंपनी, नंदुरबार यांना शेतकऱ्यांच्या शेतातील विज तोडणी तातडीने थांबविणे तसेच तोडलेली विज जोड त्वरित जोडण्यात यावी; यासंदर्भाने निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ. राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावीत, किसान मोर्चा प्रदेश सचिव शाम राजपूत, संघटन सरचिटणीस निलेश माळी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र लाहोटी, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ चौधरी, सरचिटणीस प्रविणसिंह राजपूत, तालुकाध्यक्ष किसान मोर्चा उमाकांत पाटील, चुन्नीलाल चौधरी, गणेश चौधरी, नरेंद्र पाटील सह अन्य पदाधिकारी व शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.








