नंदुरबार l प्रतिनिधी
आरोग्य विभागातील उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वर्ग चारच्या कर्मचारांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या 30 वर्षांपासून भिजत पडलेला असून पदोन्नतीचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा,यासाठी महाराष्ट्र जन-आरोग्य कर्मचारी महासंघ आक्रमक झाला आहे.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले.
पात्रता असूनही उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने त्यांना कित्येक वर्षे एकाच पदावर काम करावे लागत आहे.याबाबत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.तीन वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कोणत्याही शाखेची पदवी धारण करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बहुद्देशीय आरोग्य सेवक(पुरुष) वर्ग तीन या पदाच्या परीक्षेसाठी पात्र ठरवावे.सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अहर्ता नुसार तांत्रिक व अतांत्रिक वर्ग तीन पदावर पदोन्नती देण्यात यावी.सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या पुरेशा संधी उपलब्ध होण्यासाठी शंभर टक्के पदे राखीव ठेवावीत.अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी जन आरोग्य कर्मचारी संघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष उमेश भगूरे, उपाध्यक्ष अनिल जारवाल, सचिव जितेंद्र शिरसाठ,कार्याध्यक्ष विलास कावले, कोषाध्यक्ष नागेश गव्हाणे प्रमुख मार्गदर्शक विजय साळुंखे यासोबतच अनिल ढाकणे, विनोद ब्राह्मणे,सुनील मोते, सिद्धार्थ महापुरे, हिरालाल दाते,किरण ठाकरे,संजय भामरे महिला प्रमुख जया दळवी,कांता दांडगे,योगिता तवर आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.








