नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच नंदुरबार व नवापूर येथील 3 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हातूर्त कोरोना मुक्त झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार येथील 1 तर नवापूर येथील 2 कोरोना रुग्ण 22 नोव्हेंबर उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
जिल्हातूर्त कोरोना मुक्त झाला होता.दरम्यान आज प्रशासनातर्फे आज एकूण 180 जणांच्या आरटीपीसीआरचा अहवाल प्राप्त झाला.त्यात नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील 1 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.तब्बल 10 दिवसानंतर कोरोना रुग्ण आढळला.शेवटचा रुग्ण 14 नोव्हेंबर रोजी नवापूर येथील जनतापार्क मध्ये आढळला होता.
दरम्यान सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.








