नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार येथे संविधान जनजागृती यात्रेनिमित्ताने परवानगी नाकारलेली असतांना विना परवाना रॅली काढल्याप्रकरणी भिम आर्मीच्या जिल्हाप्रमुखांसह आठ जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार येथे काल दि.२३ नोव्हेंबर रोजी संविधान जनजागृती यात्रेनिमित्ताने भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद नंदुरबार येथे आले असता.यायात्रेनिमित्ताने परवानगी नाकारलेली असतांना देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सामाजिक अंतर न ठेवता बेकायदेशीर रॅली काढुन मोठ मोठयाने घोषणा देवुन अंधारे स्टॉप , नगरपालीका मार्गे नंदुरबार शहर पोलीस ठाणे जवळील मैदानावर येवून पोहचुन डॉ . चंद्रशेखर आझाद यांची ४०० ते ५०० महिला पुरुष जमवुन जाहिर सभा घेतली व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पोह सुनिल वामन मोरे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भिम आर्मी नंदुरबार जिल्हाप्रमुख संजय विष्णु रगडे, रवि विष्णु रगडे, लोटन आण्णा पेंढारकर, भैय्यासाहेब पिंपळे, मुन्ना यलमार, शशी खरताडे, शरद पिंपळे, मोगेश भालेराव सर्व रा. नंदुरबार यांच्याविरूध्द भादंवि क १८८,२६८,२६९ , २९० मपो अधि ३७ (१) (३) चे क ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रविण पाटील करीत आहेत.








