तळोदा l प्रतिनिधी-
एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कुलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी त्वरित शिक्षकांची नियुक्ती करावी. यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी तळोदा यांना बिरसा फायटर्स तर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कूल कार्यन्वित आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सलसाडी (तळोदा), तालंबा(अक्कलकुवा), बोरद (तळोदा), डोंगसागडे (नंदुरबार) या ठिकाणी इ.६, ७, ८ वीचे वर्ग सुरू आहेत. सलसाडी (तळोदा) येथे इ.७ व इ.८ चे ११३ विद्यार्थी. यावर्षीचे इ.६ वीचे ६० एकूण १७३ विद्यार्थी. मात्र येथे अध्यपनासाठी एकही शिक्षक नाही. हिचं परिस्थिती इतर ठिकाणी आहे. व महाराष्ट्रतील आदिवासी बहुल भागातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयलची असण्याची शक्यता आहे.
स्थानिक आश्रम शाळेतील शिक्षकांकडून काही विषयांचे थोडेफार कामकाज करून घेतले जाते. मात्र एकलव्य मॉडेल स्कुल मधील सिबीएससी प्रमाणे अभ्यासक्रम, विषय नसतांना शिकवायला लावणे, दोन्ही ठिकाणचे कामकाज यामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षक न्याय देऊ शकेल का? अगोदरच भावी पिढीचे कोरोनामुळे न भरून निघणारे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले आहे. पालक, विद्यार्थी चिंतेत आहे. तीन वर्षे होत आली तरी देखील शिक्षकांची नियुक्ती का केली जात नाही? आदिवासी विद्यार्थ्यांची खेडखंडोबा का? लवकर शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर बिरसा फायटर्सचे जिल्हा कार्याध्यक्ष भरत पावरा, लक्कडकोटचे शाखाध्यक्ष संतोष गावीत, रोझवा पुनवर्सनचे शाखाध्यक्ष बारक्या पावरा, रतिलाल पावरा, परशुराम ठाकरे, राजू ठाकरे, संजय पाडवी, सखाराम ठाकरे आदींच्या सह्या आहेत.








