नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील एका गॅरेजमधून चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील दिलीप विठोबा शिंदे चारचाकी वाहन (क्र.एम.एच.३९ २५२०) तळोदा शहरातील अय्याज अन्सारी यांच्या गॅरेजमध्ये होते. सदर दीड लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन चोरट्याने संधी साधून लंपास केले. याबाबत दिलीप शिंदे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुधिर गायकवाड करीत आहेत.








