नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकाशा येथील भवानी हट्टीतील १२ वर्षीय बालक
प्रकाशा ते तऱ्हावद रस्त्यावर गुरे चारण्यासाठी गेला असता त्याचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रकाशा येथील भवानी हट्टीतील रोहित रविंद्र कोळी (वय १२ वर्ष) हा प्रकाश ते तऱ्हावद रस्त्यावरील नाल्याकिनारी गुरे चारण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परत आला नाही. रविंद्र कोळी याच्या कुटूंबियांनी नातेवाईक व मित्र मंडळींकडे शोध घेतला असता आढळून आला नाही. याबाबत रविंद्र दौलत कोळी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.








