प्रकाशा l प्रतिनिधी
प्रकाशा ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी बी . जी . पाटील यांना डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत यावर उपायोजना करण्याच्या मागणीसाठी
जागरूक नागरिक मंचतर्फे निवेदन देण्यात आले.
प्रकाशा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत , व तत्सम साथीचे रोग डोके वर काढत आहेत . म्हणून जागरूक नागरिक मंचने वेळीच लक्ष घालून या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी व योग्य ते नियोजन करण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी गावात स्वच्छता राखण्यासाठी योग्य प्रयत्न ग्रा.प ने केले पाहिजे , अशा स्वरूपाचे निवेदन जागरूक नागरिक मंच प्रकाशातर्फे देण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष वामन मराठे , सचिव भटू शिंपी , विशाल सोनार , विनय जैन , अशोक परदेशी , अंबालाल कोळी , राजेंद्र ठाकरे , अक्षय भावसार , पंकज भिल , महेंद्र साळी , जितेंद्र ठाकरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








