नवापूर l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवती बॅकेचे आज दि २२ रोजी निकाल घोषीत झाला. यात नवापूर तालुक्यातील कोठडा येथील भारतीय जनता पार्टीचे पं.स सदस्य अमरसिंग हुरजी गावीत(सुमन सेठ) विजय झाल्याबद्दल भाजपातर्फे शहरातील बसस्थानक परिसरात फटाक्याची आतिषबाजी करुन जल्लोश करण्यात आला.
या प्रसंगी भाजपाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सचिव एजाज शेख,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,तालुका उपाध्यक्ष रमलाभाई राणा, जितेंद्र अहिरे,अल्पसंख्याक आघाडी उपाध्यक्ष शाहरुख खाटीक,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,स्वप्नील मिस्ञी,शहर चिटणीस सज्जाद बदुडा, सरचिटणीस सौरव भामरे,कृणाल दुसाने,गोपी सैन,हेमंत शर्मा,गणेश वाघ, आदी उपस्थित होते.यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात येऊन आनंद साजरा करण्यात आला.








