तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने भगवान बिरसा मुंडा जयंती सप्ताहनिमित्ताने गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमी सोरापाडा येथील विद्यार्थ्यांनी योगा जम्प रोपेचे प्रात्यक्षिक दाखवून सभागृहातील सर्वांची मने जिंकली यावेळी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगत प्रेरणा दिली. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना विशेषता खेळाडूंना मैदानी खेळ खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनेद्वारे खेळाडूंसाठी राखीव निधी ठेवून जास्तीत जास्त अतिदुर्गम भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला उपस्थित तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तसेच विविध खेळामध्ये रेफ्री ची भूमिका बजावणारे खेळाडू 2019 आदिवासी रत्न पुरस्कार विजेता अनमोल पाडवी यांचाही प्रकल्प अधिकारी यांनी सत्कार केला व राष्ट्रीय जित-कुने डो रेफरी भरत पाडवी व मगन वळवी, अजय वळवी, राष्ट्रीय जित कुने डो रौप्यापदक विजेता प्रवीण वळवी, ऑनलाइन राष्ट्रीय योगासन व जम्प रोप स्पर्धेत पदक प्राप्त करणार शिवदास पाडवी, भीमसिंग वळवी याना पुढील वाटचाली साठी सहायक प्रकल्प अधिकारी सुवर्णा साळुंखे, श्री साबळे, सहायक प्रकल्प अधिकारी बी.एफ.वसावे, कार्यालय अधिक्षक,विलास मारुती मूल्यमवार, आदी उपस्थित होते.








