नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातून जात असतांना व्यापाऱ्याला क्राईम ब्रांच चे पोलीस असल्याची बतावणी करून तपासणी करण्याच्या बहाण्याने ३५ हजाराच्या सोन्या अंगठया लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अनोळखी इसमा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नंदुरबार शहरातील व्यापारी मानकचंद चितलांब हे नंदुरबार शहरात पृष्टिधाम मंदिरासमोर देसाईपुरा भागातून जात असतांना एक अनोळखी इसमाने मोटार सायकल वरून राम राम केला म्हणून फिर्यादी मानकचंद चितलांब थांबले तेव्हा सदर अनोळखी इसमाने ओळखपत्र सारखे काहीतरी दाखवून सांगितले की , आम्ही क्राईम ब्रांच चे पोलीस आहोत रात्री दोन लाखाचा गांजा पकडलेला आहे . त्यामुळे आम्ही चेकिंग करत आहोत तुमच्या अंगावरील मुल्यवान वस्तु काढून रूमाल मध्ये ठेवण्यात सांगितले असता फिर्यादी यांनी त्यांचा रूमाल काढून त्यात दोन सोन्याच्या अंगठया , डायरी , मोबाईल पैसे ठेवले सदर इसमाने सगळ्या वस्तू रूमाल मध्ये बांधून फिर्यादी यांचे कडेस परत दिले व दोन दिवस मुल्यवान वस्तु घालून फिरू नका असे सांगितल्याने फिर्यादी तेथून निघून दामोदर प्रिटींग प्रेस येथे वहया घेण्यासाठी गेले व तेथे फिर्यादी यांनी वहया घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा रूमाल मध्ये बांधलेल्या वस्तु सोडून पाहिले असता त्यात बाकी वस्तू दिसल्या पंरतू दोन सोन्याच्या अंगठया दिसल्या नाही म्हणून फिर्यादी यांना वाटले की ३५ हजाराच्या दोन सोन्याच्या अंगठया खाली पडल्या असतील म्हणून दुकानात जावून शोधल्या पंरतू मिळून आल्या नाही म्हणून फिर्यादी यांची खात्री झाली की , सदर अनोळखी इसम याने फसवणुक करून दोन सोन्याच्या अंगठया अप्रामाणिकपणे लंपास केल्याप्रकरणी मानकचंद मु चितलांब रा . प्लॉट क्र . ०६ विदयानगर समोर धुळे रोड नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरूद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम ४२०,१७०, १७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास असई जितेंद्र जाधव करीत आहेत.