नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात महिलांचे प्रमाण पुरुषाच्या तुलनेत कमी लसीकरण झाल्याचे माहिती समोर आली होती हे बाब लक्षात घेत नवनिर्माण संस्थेने ग्रामीण भागात लसीकरण बाबत गावोगावी जाऊन महिला व पुरुषांमध्ये लसीकरण महत्व सांगत गैरसमज दूर करण्यासाठी येथील संस्थेतर्फे मिटिंग ,पथनाट्य या द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार, शहादा तालुक्यातील २०० गावांमध्ये लसीकरणाचे महत्त्व या विषयावर जनजागृती केली जात आहे. गावोगावी जाऊन तेथील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. तसेच कोरोना काळात आपण स्वतःची परिवाराची, समाजाची, गावाची कशी काळजी घ्यावी याविषयी प्रबोधन केले जात आहे.या उपक्रमासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन, पदाधिकारी, शासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. त्याचबरोबर नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी, गणेश पवार , शीतल शाक्य भूमिका भगत, अंबालाल भोई, सुदाम वळवी, रितेश गावीत, गौरी वळवी, रुपाली पगारे ,भारती चौधरी हेमंत पगारे, हेमंत मंडलिक आदी उपस्थित होते.