नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या टक्का कमी असल्याने नागरीकांनी लसीकरण करून घेण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहे. नवापूर तालुक्यात लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे लसीकरण करुन घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. नवापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक यांनी गाव पाड्यावर जाऊन ग्रामस्थांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करत आहे.
जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती अजित नाईक यांनी चिखली येथे लसीकरण केंद्रास भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी गावातील सुशिक्षीत तरुणांना लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कोरोना नियमांचे पालन करावे याविषयी मार्गदर्शन केले.










