Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरिस लागलेल्यावर कडक कारवाई करा : कन्हैय्यालाल ढोडरे यांची मागणी

team by team
November 19, 2021
in क्राईम
0
बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरिस लागलेल्यावर कडक कारवाई करा : कन्हैय्यालाल ढोडरे यांची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी-

बनावट दिव्यांग अंधत्व प्रमाणपत्र सादर करून म.रा.वि.वि कंपनीच्या धडगांव कार्यालयात दिव्यांग राखीव जागेवर शासकीय नोकरिस लागलेल्या अप्पर डिव्हीजन क्लर्क अर्जुन सुभाष सोळंके यांना निलंबीत करण्यात यावे, खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे जळगाव येथील जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच गैरप्रवृत्तीस प्रोत्साहन देणार्‍या महावितरणच्या कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्यावरदेखील निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता कन्हैय्यालाल ढोडरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
याबाबत माहिती देतांना श्री.ढोडरे म्हणाले, धडगांव (जि.नंदुरबार) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या ठिकाणी नोकरीस लागलेले अप्पर डिव्हीजन क्लर्क अर्जुन सुभाष सोळूंके यांना जळगाव जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी दि.२ नोव्हेंबर २००६ नुसार डिसऍबीलीटी सर्टीफिकेट बोगस दिले आहे. अर्जुन सुभाष सोळूंके ही व्यक्ती धडधाकड असून त्याला कोणतेही व्यंग किंवा अंधत्व, अंपगत्व नाही. त्याने नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने त्याला हे बोगस प्रमाणपत्र जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून देण्यात आलेले आहे. त्या प्रमाणपत्राचा गैरवापर करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये लिपीक पदाची नोकरी मिळवलेली आहे, व आता त्याला अप्पर डिव्हीजन क्लर्कची बढती देखील मिळालेली आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक जळगाव यांनी दिलेले बोगस प्रमाणपत्रावर आपण आक्षेप घेतला आहे. याबाबतची तक्रार अर्ज संचालक आरोग्य सेवा, उजा मंत्री नितीन राऊत, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री बच्चू कडू, आरोग्य उपसंचालक नाशिक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडेही दिली आहे. परंतू आजपावेतो योग्य ती दखल संबंधित खात्याने घेतलेली नाही.
आरोग्य उपसंचालक पी.डी. गांडाळ यांनी याबाबत चौकशी समिती नेमली आहे. त्या चौकशी समितीमध्ये नाशिक येथील वैद्यकीय अधिकारी (नेत्ररोग तज्ञ) डॉ. एस. आर.आवारी, नाशिक येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांचा त्यात समावेश आहे. मात्र, या समितीने काहीही कार्यवाही आजपावेतो केलेली नाही. जिल्हा शल्य चिकीत्सक जळगाव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अवैध गौरमार्गाने मोठ्या प्रमाणांवर खोटे/बोगस प्रमाणपत्र दिलेले आहेत परंतू त्यांची शासकीय दप्तरी कोणत्याही प्रकारची लेखी किंवा संगणकीय नोंद ठेवण्यात आलेली नाही. अर्जुन सुभाष सोळूंके यांच्याप्रमाणे अनेकांनी या शासकीय नोकरीच्या ठिकाणी दिव्यांग राखीव जागेवर खोट्या पद्धतीने नोकरी मिळवलेली आहे.
याबाबत महावितरणचे नंदुरबार येथील अधिक्षक अभियंता व धडगाव येथील उपकार्यकारी अभियंता यांना अर्जुन सुभाष सोळूंके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत लेखी निवेदने दिलेली आहेत. तरीही त्यांना अभय दिले जात आहे. आपल्या अर्जावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे जळगाव येथील जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणारा अर्जुन सुभाष सोळूंके यांस तात्काळ निलंबीत करावे, व शासन फसवणूक केल्याप्रकरणी अटक करून आजपर्यंतच्या अर्थिक लाभाची भरपाई घ्यावी. गैरप्रवृत्तीस प्रोत्साहन देणारे महावितरणचे कार्यकारी अभियंता व धडगाव उपकार्यकारी अभियंता यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी श्री.ढोडरे यांनी केली आहे. यावेळी सुरज चव्हाण उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे आमदार कार्यालयाजवळ ट्रान्सफॉर्मर जळून खाक

Next Post

शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि काकडदा जवळ बस अचानक थांबली

Next Post
शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि  काकडदा जवळ बस अचानक थांबली

शहादा आगारातून धडगावसाठी पोलीस बंदोबस्तात पाच प्रवाशांसह पहिली बस रवाना झाली आणि काकडदा जवळ बस अचानक थांबली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add