नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे दि.१९ रोजी जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हा संघाची निवडून होवून सदर संघ राज्यस्तरावर मुंबई येथे खेळणार आहे. तरी यावेळी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे सचिव जावेद बागवान यांनी केले आहे.
दि.१९ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी येथील न.पा.शाळा क्र.१, द्वारकाधीश मंदिर जवळ, नंदुरबार येथे सायंकाळी ५ वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील उपस्थित राहणार राहणार आहेत. जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेतील विजयी संघ दि.३ ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबई येथे होणार्या राज्यस्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होणार आहे, तरी यावेळी जास्तीत जास्त खेळाडूंनी जिल्हा संघ निवड चाचणीत स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे सचिव जावेद बागवान यांनी केले आहे.