Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
November 18, 2021
in क्राईम
0
रझा अकादमीवर बंदी घालण्याची विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील नांदेड, अमरावती व मालेगांव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवुन अराजक स्थिती निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी आणि चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल नंदुरबार जिल्हाच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगांव, अमरावती, आणि नांदेड आदी ठिकाणी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मोर्चा काढला. यातील काही ठिकाणी मोर्चाच्यावेळी दुकाने फोडुन, रस्त्यावरील वाहनांची हानी करुन दंगलसदृश आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ देत महाराष्ट्रात बंद पाळणे, मोर्चा काढणे, दुकानांची नासधूस करणे, दहशतीचे वातावरण तयार करणे याचा विश्व हिंदु परिषद बजरंग दल, नंदुरबार निषेध व्यक्त करत आहे. व आम्ही मा.राज्यपाल महोदयांच्याकडे अशी मागणी करत आहोत की, राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगांव मध्ये मोर्चे काढुन दगडफेक केली व दंगलसंदृश्य वातावरण निर्माण केले. तेथील सर्व आयोजक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दंगल करणार्‍यांच्याकडुन नुकसान-भरपाई घेतली जावी आणि दंगलखोर अशा रझा अकादमीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल नंदुरबार जिल्हाच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर प्रखंड अध्यक्ष नंदुरबार दिलीप बोरसे, प्रखंड मंडत्री नंदुरबार महेंद्र सोनी, प्रखंड संयोजक बजरंग गोपाळ बुनकर, विश्‍वहिंदु परिषदेचे कोषाध्यक्ष रामचंद्र महेंद्र सोनार, जळगाव सेवा विभाग यादवराव पाटील, सत्संग प्रमुख पुरुषोत्तम काळे, जिल्हा सहमंत्री अजयभाई कासार, प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख धोंडीराम शिनगर आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने झोडपले

Next Post

नंदुरबार येथे शुक्रवारी जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

नंदुरबार येथे शुक्रवारी जिल्हास्तरीय सिनिअर तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group