नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याचे इन्चार्ज यांना अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वातंत्र्यसेनानी सैनिकांच्या व सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याच्या विरोधात ॲड. डॉ.अब्दुल जब्बार शेख यांनी निवेदन दिले असून भारतीय दंड संहिता कलम 504 505 124 नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की फिल्म अभिनेत्री कंगना राणावत यांनी दि. 10 नोव्हेंबर 2019 रोजी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर भारतातल्या स्वातंत्र्यसेनानी सैनिकांच्या व तसेच त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याने त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 504 505 124 ए नुसार कारवाई करण्यात यावी यासाठी म्हसावद पोलीस ठाण्यात ॲड.डॉ.अब्दुल जब्बार शेख यांच्यातर्फे योग्य ती कारवाई करण्यात यावी.याबाबतचे निवेदन पोलीस ठाण्याचे इन्चार्ज निवृत्ती पवार यांना दिले.डॉ.अब्दुल जब्बार शेख यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.यावेळी मुन्ना मोबीन तेली अब्दुल कादरी युसुफ खाटीक बबलू लोहार व कार्यकर्ते उपस्थित होते.