नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील उदयपूर गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडलीआहे . याप्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील डोंगरीपाडा येथील दीपक सुरपा वसावा हे मोटरसायकलने (जी.जे.२६ ए ५०५३) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याने जात होते. यावेळी विजय जातऱ्या वळवी याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एम.एच.३९ व्ही ००५४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन उदयपूर गावाजवळ ट्रॅक्टर खदाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळवित असतांना समोरुन दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दीपक वसावा यांना गंभीर दुखापत झाल्याने ते ठार झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत पोना.संजय सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात विजय वळवी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना.वसावे करीत आहेत.








