नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठकीत भाजपकडून आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे . दुसरीकडे विरोधी गटातर्फे उमेदवाराचे नाव घोषित झालेले नाही . निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे .
निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली . तसेच अर्ज भरण्याची विद्यमान प्रक्रियाही सुरू झाली . पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही .धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी दि. १० डिसेंबरला मतदान होणार आहे .निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २३ नोव्हेंबर आहे . निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली . तसेच अर्ज भरण्याची विद्यमान प्रक्रियाही सुरू झाली . पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही .दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली . बैठकीत धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या जागेसाठी विद्यमान आमदार अमरीश पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले . पक्षाच्या दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल . गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे १९९ सदस्य असताना आमदार अमरीश पटेल यांना तब्बल ३३२ मते मिळाली होती . आमदार अमरीश पटेल यांच्या विरोधात कोण उमेदवारी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . विरोधकांकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही . येत्या चार दिवसांत विरोधकांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे .धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दहा मतदान केंद्र करण्यात आली आहेत . प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात मतदान केंद्र असनार आहे.








