नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावरील भामरामाळ गावाजवळ गोवंश जनावरांना क्रूरतेने वाहतूक करणार बोलेरो पिकअप वाहनासह तीन लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
नवापुर पोलिसांनी जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापूर पिंपळनेर रस्त्यावर पिंपळनेर शहराच्या दिशेने जाणारे बोलेरो पिकअप वाहन (क्र. एम.एच.04, डी.जे.6935) मध्ये गोवंश जातीचे जनावरांना अतिशय क्रूरतेने कुंबून विना चारापाणी ची सोय न करता भरलर होते यामुळे जनावरे दगावण्याची दाट शक्यता होती या वाहनात 4 गाई 1 बैल 1 वासरू अशी एकूण 6 जनावरे भरलेली आढळून आली याप्रकरणी नवापूर पोलिसांनी 53 हजार रुपये किमतीची 6 जनावरे आणि तीन लाख रुपये किमतीचे पिकप वाहन एकूण तीन लाख 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण आधी 1976 च्या आधी 1995 चे कलम 5 (5 )ब सह प्राण्यांचा छळ प्रति कलम 1960 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर अशोक मोकळ करीत आहे








