नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील शिवसुंदर नगरमध्ये अज्ञात चोरटयांनी घरफोडी करत ३७ हजार रूपये किंमतीचे ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील शिवसुंदरनगर पॉलिटेक्नीक कॉलेजमागे श्रीकांत दगाजीराव बच्छाव यांचे घर असून त्यांचे भाडेकरू बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटयांनी घराचा लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत भाडेकरू दिपक गुलाब शेवाळे यांच्या घरात प्रवेश करत पत्र्याच्या कपाटातील लॉकरतोडून ३७ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी श्रीकांत दगाजीराव बच्छाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना सामानसिंग वसावे करीत आहेत.