नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील बोरवण वरचापाडा येथील एकाने उसनवारी पैसे परत न केल्याने त्याचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी सात जणांविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील छोटुलाल रायसिंग पावरा रा.बोरवण वरचापाडा (ता.धडगांव) यांनी संशयीत आरोपी यांच्याकडून ९ लाख रूपये उसनवार घेवून ते परत न केल्याचा कारणावरून रूपेश दोहाण्या पावरा व इतरांनी संगनमत करून छोटुसिंग पावरा याला तालुक्यातील आमला गावातून मोटारसायकलवर बसवून अज्ञातस्थळी घेवून गेले. याप्रकरणी गोमीबाई छोटुलाल पावरा रा.बोरवण वरचापाडा (ता.धडगांव) यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात रूपेश दोहाण्या पावरा, विजय दोहाण्या पावरा, मगन दोहाण्या पावरा, भिमा दोहाण्या पावरा, छगन दोहाण्या पावरा, प्रदीप दोहाण्या पावरा, कालु दोहाण्या पावरा सर्व रा.तेलखेडी (धडगांव) यांच्याविरूध्द भादंवि कलम ३६५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई आर.एम.भदाणे करीत आहेत.








