तळोदा l प्रतिनिधी
तळोदा : राष्ट्रवादीचा तळोदा तालुका युवक अध्यक्षपदी कमलेश पाडवी यांची तर तळोदा युवक शहराध्यक्षपदी योगेश पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी दिले आहे. त्यांची निवडीनंतर सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहेत.
नंदुरबार येथे राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदनियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तळोदा तालुका युवक अध्यक्ष पदी कमलेश पाडवी यांची तर तळोदा युवक शहराध्यक्षपदी योगेश पाडवी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे, संदीप परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षेत्रीय, केशरसिंग क्षत्रिय, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भरत चौधरी, उपाध्यक्ष नदिम बागवान, गणेश राणे, गणेश पाडवी,चिटणीस महेंद्र पोटे राहुल पाडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.. दरम्यान या निवडनिनंतर प्रदेश सदस्य तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच पक्षा वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचा मागे पक्ष खंबीरपणे उभा राहतो आपण एकजुतीने कार्य करा असे म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या.