तालुक्यातील देहली प्रकल्पाचे रखडलेले काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू न केल्यामुळे आज १५ नोव्हेंबर रोजी खापर येथील कोराई चौफुलीवर विविध संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आंदोलनाआधीच वरीष्ठ अधिकार्यांनी बैठक घेऊन शासनाची मंजुरी येताच १५ डिसेंबरपर्यंत काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
आदिवासी जनायक बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे औचित्य साधून अक्कलकुवा तालुक्यातील याहामोगी शेतकरी संघटना, आदिवासी महासंघ, आदिवासी एकता परिषद व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने देहली प्रकल्पाचे काम सुरु करण्यासंदर्भात अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. १९७९ साली अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी येथे देहली नदीवर धरणाला मान्यता मिळाली, सुमारे ४५ वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटुनदेखील अद्यापपर्यंत धरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. धरण पूर्णत्वास आले असते तर सिंचनाची सोय झाली असती. दि. १० नोव्हेंबर पर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करावे अन्यथा याहामोगी शेतकरी संघटना, आदिवासी महासंघ, एकता परिषद व विविध संघटनेच्या वतीने दि.१५ नोव्हेंबर रोजी खापर येथील कोराई चौफुली वर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार तहसीलदार, व कार्यकारी अभियंत्यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वळवी यांना पत्र देऊन शासन व प्रशासन स्तरांवर पाठपुरावा होत असल्याने आंदोलन करु नये अशी विनंती केली होती. तत्पुर्वी प्रांताधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी मैनक घोष, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे उप कार्यकरी अभियंता बी.बी.अहिरराव, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, देहली प्रकल्पाचे उपअभियंता किशोर पावरा, कनिष्ठ अभियंता विकास शिंदे यांनी बैठक घेऊन विविध उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ही चर्चा खापर पोलीस दुरक्षेत्र कार्यालयात करण्यात आली व विकास कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी आश्वासन देण्यात आले. प्रकल्पाच्या कामाला शासनाची मंजुरी मिळताच दि.१५ डिसेंबरपर्यंत काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी भाजपा अनुसूचित जमातीचे नागेश पाडवी, जि.प.सदस्य शंकर पाडवी, आदिवासी महासंघाचे जिल्हा सचिव गिरधर पाडवी, पं.स.सदस्य जेका पाडवी, युवासेना जिल्हाधिकारी ललित जाट, शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद कामे, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष राजेश पाडवी, मोरांबाचे सरपंच ईश्वर तडवी, आंबाबारीचे सरपंच चंदूलाल तडवी, माजी सरपंच टेडग्या वसावे, आदी उपस्थित होते.