नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील केवडीपाडा (हरीपूर) येथे लहान भावाने मोठया भावाचा डोक्यात कुर्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून लहान भावाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील केवडीपाडा (हरीपूर) येथे राहणार्या विश्वास जेमा भोये (२८) राहणार केवडीपाडा पोष्ट सुतारे (ता.जि.नंदुरबार) हा त्याचा लहान भाऊ शिवाजी जेमा भोये याची पत्नी ज्योतीबाई हिला त्रास दिल्याच्या कारणावरून राग येवून शिवाजी भोये याने दि.४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास विश्वास भोये याच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून जिवे ठार मारले. याप्रकरणी पोलीस पाटील राजु सुकलाल बागुल याचा फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात शिवाजी जेमा भोये रा.केवडीपाडा (हरीपूर) (ता.नंदुरबार) याचा विरूध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि योगेश चौधरी करीत आहेत.










